लाभार्थी यादी मध्ये नाव पाहण्यासाठी
लाभार्थी यादी मध्ये नाव पाहण्यासाठी
कृषी विभागाच्या कृषी पुरस्कार वितरण कार्यक्रमात घोषणा
राज्यातील जवळपास 96 लाख कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यानं पैकी आधार लिंक असलेल्या 68 लाख शेतकऱ्यांना अनुदान मंजूर झाले आहे. यात प्रति हेक्टरी 5000 आणि 2 हेक्टर मर्यादेत असे जास्तीत जास्त 10,000 अनुदान मंजूर करण्यात आले आहे. त्यापैकी उद्या 65 लाख शेतकऱ्यांना 2500 कोटी चे वितरण होणार आहे. यावेळी बोलताना कृषिमंत्री धनंजय मुंडे म्हणाले की, शेतकर्यांच्या आनंदात माझा आनंद आहे. मी उपमुख्यमंत्री अजित दादांचे आभार मानतो, की दादा तुम्ही माझ्यावर सगळ्यात कमी वयात कृषिमंत्री पदाची जबाबदारी टाकली. या कार्यकाळात शेतकऱ्यांसाठी अनेक योजना सरकारने आणल्या. महाराष्ट्र सगळ्यात चांगले कृषि राज्य हे शेतकर्यांमुळेच असल्याची प्रतिक्रियाही त्यांनी यावेळी दिली.
लाभार्थी यादी मध्ये नाव पाहण्यासाठी
सौर कृषी पंप योजनेसाठी अर्ज दाखल करण्यात जालना जिल्ह्याची बाजी
मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेत वेबसाईटवर अर्ज दाखल करण्यामध्ये जालना Dhananjay Munde जिल्ह्याने बाजी मारली आहे. जालना जिल्ह्यातून 52067 अर्ज दाखल झाले आहेत. त्यानंतर राज्यात मराठवाड्यातील बीड (24526 अर्ज), परभणी (15.43अर्ज), छत्रपती संभाजीनगर (6888 अर्ज) आणि हिंगोली (5079अर्ज) या जिल्ह्यांचा क्रम लागतो. या योजनेत शेतकऱ्यांना जमिनीच्या क्षेत्रफळानुसार तीन ते साडेसात एचपीपर्यंतचे पंप मंजूर होतात. शेतकऱ्यांना सौर ऊर्जा निर्मिती पॅनेल्स व कृषी पंप असा सर्व संच केवळ 10 टक्के रक्कम भरून मिळतो. अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांसाठी लाभार्थी हिस्सा केवळ पाच टक्के आहे. शेतकऱ्यांना ऊर्वरित रक्कम केंद्र व राज्य सरकारकडून सबसिडीच्या स्वरुपात मिळते.